सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोन महिन्यांपूर्वीच जिर्णोद्धार केलेल्या मंदीराला भरधाव ट्रकने धडक दिल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...

मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...

Nandurbar MH
  • Oct 12 2020 12:00PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

शहादा : दोन महिन्यांपूर्वीच जिर्णोद्धार केलेल्या मंदीराला भरधाव ट्रकने धडक दिल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातात ट्रकचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे तर चालक जखमी झाला आहे.
बºहणपूर-अंकलेश्वर महमार्गावर लांबोळा गावात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, शुक्रवारी रात्री शहादाकडून तळोदाकडे जाणाऱ्या भरधाव सोळा चाकी ट्रॉलाने (क्रमांक जीजे ३ बीडब्ल्यू २७७७) काही वाहनचालकांना कट मारला होता. ते वाहनचालक आपला पाठलाग करीत असल्याचा संशय आल्याने ट्रक चालकाने भरधाव ट्रक चालविण्याचा प्रयत्न केला. लांबोळा गावाजवळ आल्यावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकने सरळ रस्त्यालगत असलेल्या मंदीराला धडक दिली. त्यात मंदीराचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज सायंकाळी मंदीर परिसरात ग्रामस्थ तेथे ठेवलेल्या बाकांवर बसत असतात.
अपघात घडला त्यावेळी सुदैवाने कुणीही नव्हते. मंदीराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन वर्गणी देखील गोळा केली आहे. आकर्षक असलेल्या या मंदीराचा एक भाग पुर्ण जमिनदोस्त झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्रकचालक देखील या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या भागात वारंवार अपघात होत आहेत. याबाबत शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

संरक्षक जाळी उभारावी..
कोळदा ते खेतिया या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बºयाच ठिकाणी काम रखडले आहे. रस्ता काम करतांना गाव व वस्ती असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत किंवा इतर अडथळे असणे आवश्यक असतांना तसे काहीही करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यामुळे मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार