सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारला पतंगीच्या वादातून एकाचा खून

जुना बैलबाजार परिसरात

Nandurbar MH
  • Sep 14 2020 10:18AM
   सुदर्शन  न्युज (केतन रघुवंशी ): नंदुरबार - येथील जुना बैलबाजार परिसरात दोन गट एकमेकांवर सशस्त्र चालून आल्यानंतर झालेल्या हाणामारीत एका इसमाचा मृत्यू झाला. खून आणि खुनाचा प्रयत्न यासंदर्भातील कलमान्वये एकोणीस जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील जुना बैलबाजार परिसरात पतंग उडवण्याच्या किरकोळ  कारणाने शनिवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी कुरेशी आणि पटवे परिवारात वाद झाला. यातूनच शहरुख कलीम पटवे आणि त्याचे 12 साथीदार लोखंडी पाइप रॉड दगड लाठ्याकाठ्या घेऊन कुरेशी परिवारावर चालून आले आणि जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले हारुण युसुफ कुरेशी यांना उपचारार्थ दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अलीसा मोहल्ला आणि जुना बैलबाजार परिसरात रविवारी देखील तणाव होता. दरम्यान लियाकत शाहिद बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख पटवे आणि पटवे परिवारातील 12 सदस्या विरोधात खून केल्याचा तसेच खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. याविरोधात कलीम शेख कासम पटवे यांनीसुद्धा दुसऱ्या बाजूने फिर्याद नोंदवली आहे या फिर्यादीनुसार अरबाज, सलीम आणि अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार