सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा दंगल प्रकरणी दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nandurbar. MH
  • Jun 12 2022 7:38PM

दगडफेकीत एक पोलिस अधिकारी
 व दोन कर्मचारी गंभीर दुखापत

अक्कलकुवा- अक्कलकुवा येथे शुक्रवारी रात्री काही धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ४८ जणांसह दोनशे जणांच्या जमावाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी तातडीने दंगल केल्याने गावात शांतता प्रस्थापित झाली आहे.याप्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरीष विरम पवार रा.अक्कलकुवा आय सपोर्ट नुपूर शर्मा अशा मजकुराचे स्टेटस ठेवले म्हणून मोहसीन रफीक मक्राणी,सुफीयान जंगीयान मक्राणी, मुन्ना उर्फ ताजमोहम्मद अल्लारखा मक्राणी, इरफान मुल्ला उर्फ इरफान इब्राहिम मक्राणी,शेर मोहम्मद मक्राणी,आरीफ खाटीक,जावेद खाटीक, इमरान मक्राणी,लकी अन्सारी, शाहरुख मक्राणी,अजहर मक्राणी,शाहीर बलोच, फिरोज मक्राणी,जावेद बलोच,कादर बलोच,अजहर शेख मक्राणी,राजमोहमंद मक्राणी, शोएब बलोच, अब्दुल अन्सारी, मोहम्मद अन्सारी,साजीद सैय्यद,तौसिफ अन्सारी,हमजा मॅकनिकल,शाहीद मॅकनिकल,आसिफ मॅकनिकल, इमरान पुदीन,दारु पहेलवान, मंजूर वेल्डींगवाला,जमिल शेख,नासीर मक्राणी,छोटु वेल्डींगवाला,फुद्दी, आसिफ मेमन, मोहम्मद मक्राणी,साकीर मक्राणी,तौसिफ मक्राणी,आदिल मक्राणी,अनिस अन्सारी,आजम अन्सारी,गुलाम मक्राणी,जुनेद मक्राणी,राजू पानटपरी वाला, आसिफ रंधेरा, अलाउद्दीन बलोच, जावेद बलोच, मुजाहीद बलोच, (सर्व रा.अक्कलकुवा) व त्यांच्या सोबत १५० ते २००  जणांनी बेकायदेशीर जमाव जमवुन कट रचून हातात दगड,विटा, काठ्या व लाकडी दांडके घेऊन गावातील शिवसेना पक्षाचे कार्यालय, तळोदा नाका,मेन रोड, झेंडा चौक, शिक्षक कॉलनी, कोंडवाडा गल्ली, हॉटेल साई खुशी,मोलगी नाका व इतर ठिकाणी घरांवर, दुकानांवर, दुचाकी, चारचाकी गाड्यांवर तसेच पोलिस व पोलिस गाड्यांवर दगडफेक करून पोलिसांना जखमी करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.पोलिस दंगल नियंत्रण करीत असताना त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. या दगडफेकीत मोलाची पोलिस ठाण्याचे सपोनि धनराज निळे, अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई प्रदीप वाघ, हवालदार रमेश कडवे हे तीन कर्मचारी गंभीर दुखापती झाले आहेत. याबाबत पोना खुशाल माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३५३,३०७,१४३,१४७,१४९,१४८,३३६,४२७,१२०(ब) सह सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक कायदा कलम ०७ व महाराष्ट्र पो.का.कलम३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि राजेश गावीत करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार