सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना संकटातही दूर्गमभागापर्यंत सहाय्य पोहोचवले- ॲड. के.सी.पाडवी

कोरोना

Nandurbar MH
  • Aug 15 2020 4:44PM
सुदर्शन न्युज  नंदुरबार   : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रीत करण्यासाठी प्रशासन चांगला प्रयत्न करत असून नागरिकांनी नियमित मास्क लावणे, साबणाने नियमित हात धुणे, शारिरीक अंतर राखणे  या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ॲड.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. एकाचवेळी 750 बाधितांच्या उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. महिला रुग्णालयाच्या नूतन इमारतीत 100 रुग्णांना ऑक्सिजन आणि 50 रुग्णांना व्हेंटीलेटरची सुविधा असणार आहे.

कोरोना संकटाच्या परिस्थितीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान देण्याचा निर्णय नुकताच मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आल्याने अनुसूचित जमातीच्या 11 लाख 55 हजार लाभार्थी कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे.

महत्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत 40 हजार नागरिकांचा नव्याने समावेश, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 21 हजार मे.टन तांदळाचे मोफत वाटप, मनरेगाच्या माध्यमातून 64 हजार नागरिकांना रोजगार, आदिवासी विभागातर्फे धान्य वाटप आदी माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रातही चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात बेघरांना घरकूल देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही  ते म्हणाले. कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करताना अर्थव्यवस्थेला गती देण्याचेही प्रयत्न आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी शिथीलता देण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि निश्चय केल्यास येत्या काळात कोरोनावर यशस्वीपणे मात करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार