सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अभिजित सिड्स नाशिक चे संचालक रवींद्र कोठावळे याना बोगस बियाणे चेक बाऊन्स संदर्भात नंदुरबार पोलिसांकडून अटक

नंदुरबार : अभिजीत सीड्‌स नासिक या कंपनीने 2017 खरीप हंगामात शेतकऱ्यांना विक्रीसाठी ज्वारी बियाणे CSH 9 Truthful

Nandurbar MH
  • Feb 3 2022 1:05PM

 

 नंदुरबार : अभिजीत सीड्‌स नासिक  या कंपनीने 2017  खरीप हंगामात शेतकऱ्यांना विक्रीसाठी  ज्वारी बियाणे  CSH  9  Truthful   नंदुरबार जिल्ह्य़ात उपलब्ध केले होते.   सदर बियाणे बोगस निघाले होते. ताटे वाढली होती पण कणीस निघाले नाही.  शेतकर्‍यांचा तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या वेळी कंपनीने नुकसानभरपाई म्हणून प्रति पाकीट ₹ 1000=00 देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विक्रेत्यांनी पेमेंट वाटप केले.  कंपनीने आपले वितरक  गोवर्धन सीड्‌स यांना  सदर पेमेंट विक्रेत्यांना द्या मी तुम्हाला पेमेंट पाठवतो त्यासाठी कोरा चेक दिला होता.  आणी ₹100=00 चा स्टॅम्प पेपरवर नोटरी करून दिली होती.   त्या नंतर  गोवर्धन सीड्‌स यांनी कंपनी कडे  पेमेंट चि अनेकदा  विचारणा केली. पण कंपनी नुसती आश्वासने देऊन चाल  ढकल करीत होती.   गोवर्धन सीड्‌स यांनी कंपनीने दिलेला चेक  वाटप करण्यात आलेली रक्कम लिहून बॅंकेत भरला होता.  पण तो चेक   पास झाला नाही.  त्यामुळे गोवर्धन सीड्‌स यांनी कोर्टात  फिर्याद दाखल केली.  आणी  कलम 420  खाली पोलिसात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून नंदुरबार  दिनांक 31  जानेवारीला नासिक येथे जावून कंपनीचे संचालक  योगेश रविंद्र कोठावळे यास अटक करून नंदुरबारमध्ये आणले. आणी कोर्टात हजर केले.  कोर्टाने त्यास 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे 
. .त्याचेवर आणखी दोन तक्रारी कोर्टात दाखल आहेत त्यांचे समन्स बजावले होते पण तो सादर समन्स घेत नव्हता.  त्याच्या अटकेमुळे बियाणे विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.  त्यास मोठी शिक्षा सुनावली जावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  नंदुरबार पोलिसांचे आभार मानले जात आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार