सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर औद्योगिक वसाहतीत कुठलाही रासायनिक उद्योग येणार नाही जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

नंदुरबार दि.30 : नवापूर औद्योगिक क्षेत्र मौजे नांदवण व प्रस्तावित सुळी आणि नवापाडा येथे कुठल्याही प्रकारचे रासायनिक कारखाने येणार नाहीत

Nandurbar MH
  • Aug 31 2021 6:30PM


नंदुरबार दि.30 : नवापूर औद्योगिक क्षेत्र मौजे नांदवण व प्रस्तावित सुळी आणि नवापाडा येथे कुठल्याही प्रकारचे रासायनिक कारखाने येणार नाहीत किंवा कोणतीही गावे विस्थापीत होणार नाहीत, या क्षेत्रात टेक्स्टाईल उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

अति.नवापूर औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र.1 मधील प्रस्तावित सुळी, नवापाडा येथील 331.20 हे.आर क्षेत्रावरदेखील उद्योग उभारण्यात येणार आहे. नांदवण क्षेत्रात रसायन निर्मितीचे कारखाने सुरू करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याबाबत नागरिकांमध्ये गैरसमज पसरल्याने नागरिकांनी मोजणीस विरोध केला आहे. सदर ठिकाणी आणि सुळी, नवापाडा येथे कोणताही रसायन निर्मिती कारखाना अथवा पर्यावरणास हानी  पोहोचविणारे उद्योगांना मंजूरी देण्यात  येणार नाही. तसेच प्रामुख्याने रोजगार निर्मिती  क्षमता जास्त असणाऱ्या टेक्स्टाईल उद्योगाला या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

 खातेदारांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात  येईल आणि कोणतेही गाव विस्थापीत होणार नाही.  या औद्योगिक क्षेत्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि ग्रामपंचायतीस मोठ्या प्रमाणात कर मिळेल. यामुळे नवापूर आणि पर्यायाने जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास होण्यास मदत होणार आहे. भूधारकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देवून स्थानिक उद्योगांमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याबाबत प्राधान्य देण्यात येणार आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सदर औद्योगिक क्षेत्रात कोणताही रासायनिक उद्योग येणार नसल्याने मोजणीसाठी व औद्योगिक क्षेत्र स्थापीत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार