सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार दि.25: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2021-2022 करीता मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Nandurbar MH
  • Aug 26 2021 11:54AM


नंदुरबार दि.25:  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2021-2022 करीता मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थाकडून अर्ज मागविण्यात  आले आहेत.

मधकेंद्र योजना सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येईल व 50 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.  शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यासोबत मधमाशा संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण व जनजागृती मंडळामार्फत करण्यात येते.

वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षणासाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. 

केंद्र चालक प्रगती‍शील मधपाळ, संस्था, व्यक्तिंना प्रशिक्षण घेण्यासाठी  अर्जदार किमान 10 वी पास असावा आणि वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्र चालक, संस्थाना प्रशिक्षण घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे  मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्वावर एक एकर शेतजमीन किंवा प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली 1000 चौ.फुट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावे. 

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे आणि मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधीताना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला रुम नं 222, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड,नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210053 ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर.एल.चव्हाण  यांनी केले  आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार