सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ

नंदुरबार दि.23: मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात आले होते.

Nandurbar MH
  • Aug 24 2021 11:16AM

 

नंदुरबार दि.23: मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात आले होते. तथापी, अर्ज स्विकारण्यास 15 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत अर्ज सादर करावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले आहे.

सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षांत दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सरासरी 60 टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांना ज्येष्ठता व  जास्त गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती  मंजूर करण्यात येते. 

शिष्यवृत्ती मंजूरीसाठी विद्यार्थ्यांनी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड,  2 पासपोर्ट फोटो, तसेच पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिट, शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी मूळ कागदपत्रासह जिल्हा व्यवस्थापक कार्यालय, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  विकास महामंडळ (मर्या) नंदुरबार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे (दूरध्वनी क्रमांक 02564- 210181) संपर्क साधावा.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार