सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खत वापर जनजागृतीच्या प्रचार वाहनाचा शुभारंभ

नंदुरबार, दि.22 : सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग

Nandurbar MH
  • Feb 23 2022 1:07PM

   नंदुरबार, दि.22 : सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग तसेच आर सी फर्टीलायझर्स प्रा.लि.तर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, कृषी उपसंचालक व्ही.डी.चौधरी, मोहिम अधिकारी एम.जी.विसपुते, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, कृषि अधिकारी वाय.एस.हिवराळे, आर.सी.फर्टीलायझर्स कंपनी प्रा.लि.चे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मोहिमेअंतर्गत एसएसपी खताच्या वापराबाबत  शेतकऱ्यांमध्ये जनजागृती नसल्याने शेतकरी एसएसपी खताच्या फायद्यापासून वंचित राहत आहेत. तीन  बॅग एसएसपी आणि एक बॅग डिएपी यांच्यासाठी शेतकऱ्यांना सारखीच रक्कम खर्च करावी लागते आणि साधारण सारख्याच प्रमाणात स्फुरदाची मात्रा पिकांला मिळत असते आदी विविध बाबींसंदर्भात जनजागृती  या चित्ररथा मार्फत करण्यात येणार आहे. 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार