सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शासकीय औद्योगिक संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नंदुरबार

Nandurbar. MH
  • Apr 19 2022 7:36PM
शासकीय औद्योगिक संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन
 
नंदुरबार, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे गुरुवार 21 एप्रिल 2022 रोजी शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यात पाचवी, दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारासाठी नामांकित कंपनीच्या आस्थापनातील 540 अंदाजीत पदासाठी रोजगाराची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. मेळाव्यास येताना सेवायोजन कार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड,तळ मजला रुम नं.27 नंदुरबार (02564-295801 )  तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जी.टी.पी कॉलेज रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा. या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने सहायक आयुक्त यांनी केले आहे.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार