सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाची जोडणी करा -जिल्हाधिकारी

नंदुरबार :- सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्याचे मासिक वाटप करताना रास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस यंत्राद्वारे शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाची जोडणी

Nandurbar MH
  • Dec 26 2020 6:45PM
नंदुरबार  दि. 26 : सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्याचे मासिक वाटप करताना रास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस यंत्राद्वारे शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाची जोडणी (सिडींग) करावी. तहसील कार्यालयांनी जोडणी न झालेल्या लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करून 31 जानेवारी 2021 पूर्वी जोडणी करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाची जोडणी आवश्यक आहे. यासाठी रास्तभाव दुकानदार व पुरवठा निरीक्षक यांना आधार व मोबाईल सिडींगबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. 31 जानेवारी पर्यंत लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग न झाल्यास त्यांना देण्यात येणारे धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येईल व याची जबाबदारी संबंधित तहसीलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकांची राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले  आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार व मोबाईल क्रमांक सिडींग झाले नसल्यास रास्तभाव दुकानदारांशी संपर्क साधून सिडींग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार