सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रात्रीच्या अंधारात गायींना जखमी करण्याचे अजब सत्र; हा माथेफिरूला कोण? पोलिसांसमोर आव्हान

नंदुरबार - रस्त्यावरील गायींवर रात्री कोयत्याने अथवा सुर्‍याने गंभीर वार

Nandurbar. MH
  • Feb 19 2021 5:38PM
केतन रघुवंशी . मो.8421732333.   नंदुरबार.
नंदुरबार - रस्त्यावरील गायींवर रात्री कोयत्याने अथवा सुर्‍याने गंभीर वार करायचा व खोल जखम करून तिला मरणासन्न स्थितीत सोडायचे, असा अघोरी प्रकार शहादा शहरात दोन दिवसापासून घडत आहे. यामुळे आतापर्यंत दहा-बारा गायी जखमी झाल्या असून हा निर्दयी प्रकार घडवणाऱ्या माथेफिरूला ताबडतोब अटक करावी; अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात अधिक वृत्त असे की, शहादा शहरात गुरुवार रोजी पोटावर, पाठीवर सहा इंचाच्या, पाऊण फूट लांबीच्या खोल जखमा झालेल्या गायी आढळून आल्या. एक दोन नव्हे तर पाच ते सहा गाई अशा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पाठीवर पायावर पोटावर कोयत्या सारख्या शस्त्राने खोल घाव घातलेला दिसून आला. हे कृत्य कोणी कशासाठी केले? याचा संदर्भ लागला नाही. परंतु गोप्रेमी व्यक्तींनी ताबडतोब दखल घेऊन त्यांच्यावर उपचार केले. शुक्रवारी पुन्हा असाच प्रकार घडलेला आढळला. आणखी पाच ते सहा गाई रक्तबंबाळ झालेल्या आढळून आल्या. यांच्याही पोटावर खांद्यावर पायावर कोयत्या सारख्या शस्त्राने वार केलेला दिसून आला. हा निर्दयी प्रकार रात्रीच्या अंधारात छुपेपणाने केला जात आहे. विशेष असे की गायीच्या शरीरातील रक्त काही तास वाहत राहून ती मरणासन्न अवस्थेत जावी, अशा दृष्ट पद्धतीने कुणी अज्ञात माथेफिरु हे हल्ले करीत आहे. यामुळे जनमानसात प्रचंड संतप्त भावना उमटू लागल्या आहेत. सीसीटीव्हीची मदत घेऊन वेळीच या षडयंत्राचा तपास लावणे आवश्यक बनले आहे. पोलीस विभागाने व प्रशासनाने ताबडतोब या प्रकाराची दखल घ्यावी; अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे. धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या हेतूने अथवा धार्मिक द्वेषाने हे घडवले जात आहे काय? याचाही तपास करण्याची अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार