सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पाऊस आला मोठा आणि रस्ता गेला वाहून . अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वालांबा - उमरपाडा ते गुजरात हद्दी

अतिदुर्गम भागातील वालांबा - उमरपाडा ते गुजरात हद्दी

Sudarshan MH
  • Jul 4 2023 9:28AM
अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा
           पाऊस आला मोठा आणि रस्ता गेला वाहून .
    अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वालांबा - उमरपाडा ते गुजरात हद्दी कडे जाणारा फक्त 600 मीटरचा रस्ता तयार झाल्यानंतर फक्त दोनच दिवसात वाहून गेल्याची आश्चर्यकारक बाब घडून आली.यावरुन असे लक्षात येते की रस्त्यांची गुणवत्ता कशी असेल.दोन दिवसातच सकाळी झालेल्या पावसाने रस्ता पार  धुऊन निघाला.अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार होण्याची प्रतिक्षा होती.वाहन चालवणे जिकीरीचे होते मात्र अलिकडे रस्ता मंजूर होऊन काम करण्यात आले.व दुर्दैवाने त्या रस्त्याचे अवघ्या दोन दिवसातच पावसामूळे तिन तेरा वाजले.यावरून हे लक्षात येते की कामाची गुणवत्ता कशी असेल. रस्ता तयार केल्यानंतर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चारी खोदणे जरुरीचे असते मात्र चारी नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यांची वाट लागते. अतिदुर्गम भागातील संपूर्ण रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे व अनेक वर्षापासून साधी डागडूजी ही करण्यात येत नसल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून येत आहेत.मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात.तालुक्यात झालेल्या रस्त्यांची कामे गुणवत्ता पूर्ण होणे गरजेचे असल्याने याकडे जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री यांनी ही लक्ष घालण्याची गरज असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार