सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खाईच्या सावरखाडीपाडा शाळेचे पत्रे दोन वेळा उडाले असून शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत‌ असलेल्या शाळेच्या दुरूस्ती ला अखेर शाळा सुरू झाल्यावर सुरूवात.

शाळेच्या दुरूस्ती ला अखेर शाळा सुरू झाल्यावर सुरूवात.

Sudarshan MH
  • Jun 24 2023 6:35AM
अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा 7057283888
          
       अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील
खाईच्या सावरखाडीपाडा शाळेचे पत्रे  दोन वेळा उडाले असून शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत‌ असलेल्या शाळेच्या दुरूस्ती ला अखेर शाळा सुरू झाल्यावर सुरूवात.
          तब्बल महिन्याभरापासून अक्कलकुवा येथील गटसाधन केंद्राला दुरुस्तीची मागणी केलेली असून संबंधित शाळेची दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी करण्यात आली होती आता शाळेच्या दुरूस्ती चे काम सुरू असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
          अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम भागातील खाई या गावाच्या सावरखाडीपाडा या जिल्हा परिषद शाळेची पत्रे गेल्या सहा महिन्यात दोन वेळा जोरदार हवेमुळे उडाली असून प्रथम एकदा उडालेल्या या पत्रांची दुरुस्ती ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेली होती. मात्र गेल्या महिन्याभरापूर्वी आलेल्या वादळामुळे परत शाळेची पत्रे उडाली असल्याने याच अवस्थेतच शाळेत विद्यार्थ्यांना बसवले जात आहे व शिक्षक देखील निकाल तयार करण्याचे काम याच शाळेत बसून करत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले. याबाबत विचारणा केली असता शाळा दुरुस्ती संदर्भात एक महिन्यापूर्वी अक्कलकुवा येथील गट साधन केंद्रात दुरुस्तीच्या प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले गेले होते.आता शाळेच्या दुरूस्तीच्या कामाला ग्रामपंचायत मार्फत सुरुवात झाली आहे.
      १५ जून रोजी शाळेचे नवीन शैक्षणिक सत्र  सुरू होण्याच्या आधी संबंधित शाळेच्या पत्र्यांची दुरुस्ती दर्जेदार रित्या करून शाळा सुस्थितीत आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती.अन्यथा विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल. एकीकडे शासन विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत असतात मात्र अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या आत शिक्षण देत असताना देखील अशा विदारक परिस्थितीमध्ये शिक्षण घेण्याची वेळ येत असल्याने खंत व्यक्त केली जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार