सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी 2023 ते डिसेंबर,2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये चुकीची

मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये चुकीची

Sudarshan MH
  • Jun 13 2023 4:19PM
नंदुरबार :(प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी 2023 ते डिसेंबर,2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये  चुकीची प्रभाग रचना, आरक्षण झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन) गोविंद दाणेज यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे
शुक्रवार, 16 जून 2023 रोजी आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. बुधवार, 21 जून, 2023 रोजी विशेष ग्रामसभा बोलवून आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. शुक्रवार, 23 जून, 2023 रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला (नमुना ब ) जिल्हाधिकारी मान्यता देतील. सोमवार, 26 जून, 2023 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवार, 27 जून 2023 ते सोमवार, 3 जुलै,2023 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. शुक्रवार, 7 जुलै,2023 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देण्यात येईल. बुधवार, 12 जुलै,2023 रोजी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ ) जिल्हाधिकारी मान्यता देतील. तर शुक्रवार, 14 जुलै,2023 रोजी अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्ध देण्यात येईल. असे उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) श्री.दाणेज यांनी कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार