सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेशन दुकानदार अनियमितपणे रेशनिंगचे धान्य वाटप करीत असल्याच्या तक्रारी सरपंच अविनाश गावित व ग्रामपंचायतीकडे

रेशन दुकानदार अनियमितपणे रेशनिंगचे धान्य वाटप करीत असल्याच्या तक्रारी सरपंच अविनाश गावित व ग्रामपंचायतीकडे

Sudarshan MH
  • Jun 12 2023 3:39PM
नंदुरबार : (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेशन दुकानदार अनियमितपणे रेशनिंगचे धान्य वाटप करीत असल्याच्या तक्रारी सरपंच अविनाश गावित व ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आज खांडबारा गावचे सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी यांच्यासह गावातील ग्रामस्थ यांनी नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना सदर प्रकरणाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी याबाबतचे निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की खांडबारा गावातील रेशन दुकान परवानाधारक श्रीमती शोभा भिका चौधरी व गायत्री महिला गृह उद्योग असे स्वस्त धान्य दुकान परवाना मिळालेला असून सदर दोन्ही स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत गावातील ग्रामस्थांना नियमितपणे स्वस्त धान्य मिळत नाही तसेच लाभार्थ्यांसोबत धान्य दुकानदार हे अरेरावीची भाषा करीत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आला आहे प्राप्त तक्रारीनुसार या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी याबाबतची मागणी या निवेदनातून सरपंच अविनाश गावित व ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे यावेळी सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य व खांडबारा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार