सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: धावत्या कारवार झाड कोसळून एकाचा मृत्यू, चक्रीवादळामुळे 35 शेळ्याही दगावल्या*

, चक्रीवादळामुळे 35 शेळ्याही दगावल्या*

Sudarshan MH
  • Jun 4 2023 6:28PM
नंदुरबार: धावत्या कारवार झाड कोसळून एकाचा मृत्यू, चक्रीवादळामुळे 35 शेळ्याही दगावल्या*

नंदुरबार - गुजरात राज्यातील चक्रीवादळ घरांची, शेत पकाची प्रचंड नासधूस करीत नंदुरबार जिल्ह्यात येऊन थडकले. त्यामुळे नंदुरबार तळोदा अक्कलकुवा शहादा या तालुक्यांमध्ये विद्युत खांब आणि अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, या वादळी पावसात तळोदा तालुक्यात 30 हून अधिक शेळ्या मरण पावल्या. तर, विद्युत तारांचे घर्षण होऊन झाडांनी पेट घेतल्याची घटना नंदुरबार शहरात घडली. 

आज दि.४ मे रोजी सकाळी १० वाजता अचानक वादळी वाऱ्याने रौद्र रुप धारण केले.त्यात तळोदा तालुक्यातील तळोदा-चिनोदा रस्त्यावर वडाचे झाड गाडीवर कोसळून एकचा जागीच मृत्यू झाला. प्रतातपुर ता. तळोदा येथील राजेंद्र रोहिदास मराठे (वय- ४२ ) असे मृत इसमाचे नाव आहे (जी.जे. -06 जी. ई-0541) आर्टीगा या स्वतःच्या कारने ते जात असताना त्यांच्या कारवर झाड कोसळल्याने गाडीचा वरचा पत्रा फाटला व या अपघातात राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झाला, 

आज दि.४ मे रोजी प्रारंभी 11 ते 12 वाजे दरम्यान नंदुरबार जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात चक्रीवादळाचा फटका बसला. अशातच विजांचा प्रचंड कडकडाट करीत कुठे मुसळधार तर कुठे बारीक सरी कोसळल्या. शहादा तालुक्यातील अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडून जाणे कौलारू छत कोसळणे अशा घटना घडल्या. अक्कलकुवा खापर रस्त्यावर लहान मोठे वृक्ष कोसळलेले दिसले.  तळोदा तालुक्यात देखील झोपड्या उडून जाणे पत्रे उडून जाणे अशा घटना घडल्या. नंदुरबार तालुक्यात काही ठिकाणी याच प्रकारचे नुकसान झाले एका कापूस गोदामाचे या वादळामुळे मोठे नुकसान झाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार