सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या मोटार सायकल रॅलीचे आयोजन

पोलीस दलाच्या वतीने महिलांच्या मोटार सायकल रॅलीचे आयोजन*

Sudarshan MH
  • Mar 9 2023 6:38AM


नंदुरबार - 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रैली आयोजित केली होती, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर जनमानसात बाल विवाह विरोधी जनजागृती करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता. 

 मोटार सायकल रॅलीत पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचेसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 150 महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार हेल्मेटसह सहभागी झाले होते.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व अमंलदार यांची मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली व तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रैलीचा उत्साह वाढविला.

प्रारंभी रॅलीला सकाळी 11.30 वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व डॉ. श्रीमती तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांनी हिरवा झेंडा दाखविला. मोटार सायकल रॅली समोर पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून लोकांमध्ये व रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले. पोलीस अधीक्षक कार्यालय येथून निघून नवापुर चौफुली, साक्री नाका, सोनार खुंट, हाट दरवाजा, सिंधी कॉलनी. C. B. पेट्रोल पंप व तेथुन गांधी पुतळा, नेहरु पुतळा, नगर पालिका, आंधारे चौक, धुळे चौफुली, नवापुर चौफुली व पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण केले. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे समारोप झाला. महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांच्या रॅलीने नंदुरबारवासीयांचे लक्ष वेधून महिला शक्तीचे प्रदर्शन केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार