जिल्ह्यात ४ ठिकाणी चोरी
नंदुरबार- जिल्ह्यात ४ ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे चोरट्यांनी २ दुचाकी, रोख रक्कम व पाण्याची मोटार व केबल चोरुन नेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा येथील आमदार कार्यालय समोर अज्ञात चोरट्याने अहमद मजीद निसानी यांची मोटारसायकल मध्यरात्री राहत्या घरुन चोरुन नेली.दुसऱ्या घटनेत तळोदा तालुक्यातील बोरद येथे चोरट्यांनी राहुल बन्सी पाटील यांची मोटारसायकल शेतातून चोरुन नेल्याची घटना दि.१६ ऑक्टोबर रोजी दुपारी चोरुन नेली. तिसऱ्या घटनेत तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथे ऊसतोड मुकादमाच्या कारच्या मागील डिक्कीचे लॉक तोडून निलेश राजेश वळवी रा.लक्कडकोट याने सिटच्या मागे ठेवलेल्या बॅगेतून १ लाख ८० हजार रुपये रोख चोरी केल्याची घटना दि.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.
चौथ्या घटनेत चोरट्यांनी रुपेश सयाजीराव पाडवी रा.खापर यांच्या कोराई शिवारातील शेतातून मध्यरात्री ११८०० रु.किंमतीची पाण्याची मोटार व ६ हजार रुपये किंमतीची केबल चोरुन नेली. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.