सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जि.प.च्या अध्यक्षपदी डॉ.सुप्रिया गावीत यांची निवड जिल्हा परिषदेत सत्तांतर, भाजपातर्फे कॉंग्रेसला दे धक्का

जिल्हा परिषदेत सत्तांतर, भाजपातर्फे कॉंग्रेसला दे धक्का

Sudarshan MH
  • Oct 18 2022 6:22AM

नंदुरबार - नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी राजकीय खेळी करून सत्तांतर घडवून आणले आहे. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत जि.प.अध्यक्षपदी डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत या तर उपाध्यक्षपदी भाजप पुरस्कृत सुहास नाईक विजयी झाले आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. जि.प.अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे डॉ.सुप्रिया गावीत व कॉंग्रेसतर्फे विद्यमान जि.प.अध्यक्षा सिमा पदमाकर वळवी यांच्यात लढत झाली.यात भाजपच्या डॉ.सुप्रिया गावीत ३१ मतांनी विजयी झाल्या तर कॉंग्रेसच्या सिमा पदमाकर वळवी यांचा पराभव झाला.त्यांना २५ मते मिळाली.
उपाध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे  पुरस्कृत सुहास नाईक व शिंदे गटाचे राम चंद्रकांत रघुवंशी यांच्यात लढत झाली.त्यात ३१ मतांनी भाजपचे सुहास नाईक विजयी झाले तर राम रघुवंशी हे पराभूत झाले आहेत. त्यांना २५ मते मिळाली.
जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे २४,भाजपा २०, राष्ट्रवादी काँग्रेस ३, शिंदे गट ५, ठाकरे गट ३ असे राजकीय बलाबल आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आधीच आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला होता.शहादा तालुक्यातील एका सदस्याने ही भाजपला साथ दिली तसेच कॉंग्रेसचे ५ सदस्य, ठाकरे गटातील २ सदस्यांनी भाजपला मतदान केले.यामुळे डॉ.सुप्रिया गावीत व सुहास नाईक यांचा विजय होऊन सत्तांतर घडून आले. कॉंग्रेसने व्हीप बजावला असताना विरोधात मतदान झाले आहे. याव्यतिरिक्त पडद्याआड अनेक राजकीय हालचाली घडल्या आहेत.तरीही  कॉंग्रेसची अडीच वर्षे सत्ता शिवसेनेच्या पाठिंब्यावरच होती.
डॉ.सुप्रिया गावित विजयी होताच जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.यावेळी खा.डॉ हिना गावीत, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, माजी जि.प.अध्यक्षा कुमुदिनी गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी,माजी आमदार शिरीष चौधरी,माजी जि.प.उपाध्यक्ष जयपाल रावल, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, डॉ कांतीलाल टाटीया आदि मान्यवर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार