नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. राज्यातील पालकमंत्री पुढीलप्रमाणे
गिरीश महाजन -धुळे,लातुर, नांदेड, गुलाबराव पाटील -जळगाव, बुलढाणा, दादा भुसे -नाशिक आदिं पालकमंत्र्यांचा समावेश आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची निवड करण्यात आल्याने नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा कार्यकर्ते व डॉ.गावीत यांच्या समर्थकांनी पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नंदुरबार जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नंदुरबार व शहादा तालुक्यात भाजपाला मोठे यश मिळाले.अनेक ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे. आता मंत्रीपदाचा उपयोग जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.§