सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बॅटऱ्या व इन्व्हर्टर चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

नंदुरबार एलसीबीची कारवाई

Sudarshan MH
  • Aug 28 2022 3:26PM


नंदुरबार एलसीबीची कारवाई

नंदुरबार - शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळील फेमस बॅटरी या दुकानाच्या गोडाऊन मधुन लाखो रुपयांच्या बॅटऱ्या व इन्व्हर्टर चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना मुद्देमालासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडल्याची कामगिरी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळील फेमस बॅटरी या दुकानाच्या गोडाऊन मधुन सुफीयान रज्जाक शेख (रा.पटेलवाडी) व मयुर भामरे यांनी ३ लाख ६५ हजार ३०६ रुपये किंमतीच्या  बॅटऱ्या व इन्व्हर्टर चोरी केल्या होत्या.याप्रकरणी शेख मुस्तफा हसन मनियार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॅटरी चोरीचा संशयित पटेल वाडी परिसरात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले.दरम्यान पोलिसांनी सुफीयान रज्जाक शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देत चोरी केलेल्या बॅटऱ्या व इन्व्हर्टर तळोदा येथील मयुर अरुण भामरे याला विक्री केल्याचे सांगितले.यानंतर पोलिसांनी तळोदा येथे जाऊन मयुर भामरे याला मुद्देमालासह ताब्यात घेतले.सदर कामगिरी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक संदिप पाटील, हवालदार राकेश वसावे, पोलिस नाईक राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमढेरे,पोका.अभय राजपूत, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार