सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुराच्या पाण्यामुळे विसरवाडी जवळ राष्ट्रीय महामार्गावर ठप्प, वाहनांच्या रांगा

विसरवाडी - संततधार पावसामुळे विसरवाडी जवळील पुल पाण्यात बुडाल्याने धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. या महामार्गावर पाचव्यांदा वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Sudarshan MH
  • Aug 16 2022 11:23AM

विसरवाडी - संततधार पावसामुळे विसरवाडी जवळील पुल पाण्यात बुडाल्याने धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. या महामार्गावर पाचव्यांदा वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे बांधकाम सुरू आहे.त्यामुळे पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक सुरू होती.मात्र गेल्या चोवीस तासांपासून नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.शनिवारी व रविवारी दिवसभर आणि रात्री पाऊस होता.त्यामुळे विसरवाडी जवळील सरपिणी नदीला पूर आल्याने १५ ऑगस्ट रोजी पुन्हा महामार्गावरील वाहतूक बंद पडली.रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.विसरवाडी पोलिसांनी वाहतूक शेवाळी मार्गे वळवून वाहनधारकांना वाट दिली.सदर महामार्गावरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे पाचव्यांदा बंद करावी लागली आहे.वाहनधारकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.सदर नदीवरील पूलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने हा महत्वपूर्ण महामार्ग वारंवार बंद होतो आहे.याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार