सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

५ लाखांसाठी विवाहितेचा छळ नाशिकच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

लाखांसाठी विवाहितेचा छळ नाशिकच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • Jul 10 2022 3:38PM


शहादा - पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपये आणावेत यासाठी शहाद्याच्या विवाहितेचा छळ सासरच्या मंडळींनी केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी नाशिक येथील ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा येथील निशा प्रशांत शिंदे (वय ३४,रा.दोंडाईचा रोड, गोकुळधाम) यांचा विवाह नाशिक येथील प्रशांत रविकांत शिंदे यांच्याशी झाला.दरम्यान लग्नानंतर पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी विवाहिता निशा शिंदे हिने आपल्या माहेरुन ५ लाख रुपये आणावेत तसेच शहादा कोर्टात दिलेला खावटीचा अर्ज मागे घ्यावा यासाठी पती प्रशांत रविकांत शिंदे, रविकांत केशव शिंदे, रोहिणी रविकांत शिंदे ( सर्व रा.अथर्व अपार्टमेंट, नाशिक), दिपाली नितीन डोके, नितीन अरुण डोके (दोघे रा.साक्षी अपार्टमेंट नाशिक) सदर विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला.सदर प्रकार २००९ ते २५ नोव्हेंबर २०२१ सासरी व माहेरी घडला.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार तारसिंग वळवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार