सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

Nandurbar. MH
  • Jul 6 2022 3:33PM


नंदुरबार, दि.6 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे. 

खरीप हंगामासाठी नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग, स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण तसेच पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनास येणारी घट, जसे नैसर्गीक, आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भुसखलन, दुष्काळ यांना संरक्षण देय आहे.योजनेत समाविष्ट शेतकऱ्यांनी बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनी, बँक, किंवा कृषि अथवा महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकावर कळवावे. नुकसान कळवितांना सर्व्हे क्रमांक व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे. 

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी मुदतीपुर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा, जन सुविधा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. संबंधित शेतकऱ्यांना बँकेत बचत खाते उघडणे आवश्यक राहील.

योजनेत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम, शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा दर पुढील प्रमाणे: भात पिकासाठी प्रति हेक्टरी 40 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 800 रुपये प्रती हेक्टर. ज्वारी पिकासाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 650 रुपये प्रती हेक्टर. बाजरी पिकासाठी प्रति हेक्टरी 27 हजार 500 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 550 रुपये प्रती  हेक्टर, भुईमूग पिकासाठी प्रति हेक्टरी 37 हजार 500 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 750 रुपये प्रती हेक्टर,सोयाबीन पिकासाठी  प्रति हेक्टरी 50 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 1 हजार रुपये प्रती हेक्टर, मुग व उडीद पिकासाठी प्रति हेक्टरी 22 हजार 500 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 450 रुपये प्रती हेक्टर, तूर पिकासाठी प्रति हेक्टरी 36 हजार 802 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 736 रुपये प्रति हेक्टर, मका पिकासाठी  प्रति हेक्टरी 35 हजार 598 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 711 रुपये 96 पैसे प्रती हेक्टरी तर कापुस पिकासाठी प्रति हेक्टरी 50 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 2 हजार 500 रुपये प्रती हेक्टर इतका विमा हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. 

नंदुरबार जिल्ह्यासाठी एग्रीकल्चर इन्शुरन्स  कंपनी ऑफ इंडिया लि.मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्स्चेंज टावर्स, 20 माळा,दलाल स्ट्रीट फोर्ट मुंबई 400 023 (टोल फ्री क्रमांक 1800 419 5004) ईमेल pikvima@aicindia.com ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. कंपनीचा जिल्ह्यासाठी राहूल पाटील प्रतिनिधी असून त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422218356  असा आहे.

या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 ही असून शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी अथवा आपले सरकार सेवा केंद्र,जनसुविधा केंद्र, यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार