सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित* *आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी ;* *जिल्हाधिकारी मनीषा खत्री*

आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी ;* *जिल्हाधिकारी मनीषा खत्री*

Sudarshan MH
  • Jun 7 2022 4:46PM


नंदुरबार, दि.7 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आपत्ती झाल्यास याबाबतची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनास किंवा जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यास अनुसरून जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी विविध विभागांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे.

 जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. नर्मदा व तापी या दोन प्रमुख नद्या जिल्ह्यातून वाहतात. प्रकाशा, सारंगखेडा बॅरेज, अमरावती, रंका,चौपाळे, चिरडा, देवळीपाडा, मेंदीपाडा, ढोंग, नेसू, विसरवाडी, भरडू, रायगण, मुगधन, खेकडा, सुळीपाडा, रंगावली, दरा, देहली, नर्मदा शिवण इत्यादी मध्यम व  लघु प्रकल्प आहेत. 2006 मध्ये तळोदा तालुक्यातील सोजराबारी येथे दरड कोसळल्यामुळे दुर्घटना, 2016 मध्ये मान्सुन काळात अतिवृष्टीमुळे झालेली पाचोराबारी दुर्घटना, 2018 मध्ये पुरामुळे नवापूर येथे झालेले नुकसान व सन 2019 मध्ये जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी झाली होती. इत्यादी बाबी विचारात घेता सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यानुसार 1 जून 2022 पासून जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित केला आहे. तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीची माहिती तत्काळ 02564-210006 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 यावर कळवावी. 

गंभीर धोक्याचे ठिकाणी वावर असणाऱ्या लोकांची जीवित व वित्त हानी होवू शकते यासाठी जिल्ह्यातील असे धोकादायक ठिकाणांची जागा निश्चित करुन त्याठिकाणी खबरदारीचे उपाय म्हणून सूचना फलक लावावेत. याशिवाय सर्व विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, व्हॉटस ॲप क्रमांकांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. या कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोबाईल सुरू ठेवावेत.

आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या काळात व आपत्ती काळानंतर संबंधित प्रत्येक विभागाने नियोजनाप्रमाणे तत्काळ प्रतिसाद द्यावा. सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला सादर करावी. 
00000
*जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवसथापन प्राधिकरणाची मॉन्सून पूर्व आढावा बैठक घेवून सर्व विभागांना आपापली* *जबाबदारी, कर्तव्याची माहिती दिली आहे. सर्व मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रणा तपासून घेतल्या आहेत. पावसाळ्याच्या* *कालावधीत जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यकतेनुसार सूचना देण्यात येतील.* 
 *-मनीषा खत्री जिल्हाधिकारी तथा अध्यक्षा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नंदुरबार*
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार