सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईत फ्लॅट दाखवून नंदुरबारच्या एकाची १४ लाखांत फसवणूक नंदुरबार- मुंबई येथील मांटुगा परिसरातील फ्लॅट दाखवून

नंदुरबारच्या एकाची १३ लाख ८५ हजारांत दोघांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

Nandurbar. MH
  • May 16 2022 5:16PM
 नंदुरबारच्या एकाची १३  लाख ८५ हजारांत दोघांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयंतीलाल भिलचंद कासार (वय६५,रा.वृंदावन कॉलनी, नंदुरबार) यांना राजन चिमणलाल शाह(रा.गिरीविहार, नंदुरबार) व घनश्याम राजदेव सिंग(रा.अजीजबाग, चेंबूर, मुंबई) या दोघांनी मुंबई येथील मांटुगा परिसरातील ६० लाख रुपये किंमतीचा फ्लॅट विक्री करायचा आहे, असे सांगून त्यांना मुंबई येथे नेऊन एका बारा मजली अपार्टमेंटमध्ये फ्लॅट दाखवून टोकण मनीच्या नावाने ५० हजार रुपये व त्यानंतर आरटीजीएसने १५ लाख रुपये घेतले.त्यानंतर जयंतीलाल यांनी फ्लॅट चार ताबा न दिल्याने त्यांनी आपले पैसे परत मागितले असता दोघांनी त्यांना १लाख ६५ हजार रुपये परत दिले.उर्वरित १३ लाख८५ हजार रुपये परत न करता ते त्यांची फसवणूक केली.सदर प्रकार दि.२ डिसेंबर २०२० ते १५ मे २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार