सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाना पटोले यांचा गावगुंड मोदी आज पत्रकारांच्या समक्ष...

प्रकरण चांगलंच गाजत असताना नाना पटोलेंनी आज नागपुरात आपले वकील सतीश उके यांच्याकरवी आपला दावा खरा करुन दाखवण्यासाठी उमेश उर्फ मोदी प्रेमदास घडे याला प्रसारमाध्यमांसमोर हजर केलं.

Snehal Joshi .
  • Jan 21 2022 8:42PM

निवडणुक प्रचारादरम्यान भंडारा-गोंदिया येथे पंतप्रधान मोदींच्या विषयी   मी मारू शकतो, मी शिव्याही देऊ शकतो  या    वक्तव्यानंतर  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच अडचणीत आले. भाजप ने  याविरुद्ध आक्रमक  भूमिका घेतली नाना पटोलेंविरुद्ध राज्यभरत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मागणी होऊ लागली. नानांचे पुतळे जाळण्यात आले, आंदोलन झालीत, नानांच्या विरोधात होल्डिंग बॅनर ही राज्यात पाहायला मिळाले. यानंतर नाना पटोलेंनी यू-टर्न घेत आपण उल्लेख केलेला मोदी हा  गावगुंड असल्याचं सांगितलं.

हे प्रकरण चांगलंच गाजत असताना नाना पटोलेंनी आज नागपुरात आपले वकील सतीश उके यांच्याकरवी आपला दावा खरा करुन दाखवण्यासाठी उमेश उर्फ मोदी प्रेमदास घडे याला प्रसारमाध्यमांसमोर हजर केलं.

अखेर मोदी नावाचा गावगुंड पोलिसांना गवसला, असे सांगून त्याला आज बोलक  करायचं होतं पण...

मी मोदींना मारु शकतो असं वक्तव्य नाना पटोलेंनी केल्यानंतर राज्यभर गदारोळ उडाला होता. भंडारा-गोंदियात असा कोणता मोदी नावाचा गावगुंड आहे की नाही यासाठी प्रसारमाध्यमांनी शोधमोहीमही राबवली. परंतू नानांनी उल्लेख केलेल्या मोदीवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं पोलीस तपासात 3 दिवसां नंतर सांगण्यात आले.

यावेळी नागपुरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद पटोलेंचे वकील उके यांनी उमेश घडे यांनाच नाना पटोले मोदी उद्देशून बोलल्याचं सांगितलं. यावेळी उमेश उर्फ मोदी प्रेमदास घडे यांनीही दारुच्या नशेत मी नाना पटोले आणि काँग्रेसला मतदान करु नका असं बोललो होतो. यावेळी मी शिवीगाळ केल्याचंही उमेश घडे यांनी मान्य केलं. पत्रकार परिषदेनंतर वकीलांनी उमेश घडे यांच्याशी कोणताही पत्रकार संवाद साधणार नाही याची  सावधगिरी बाळगली गेली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातली सत्यता नेमकी काय आहे..? हे  तपासाअंती समोर येईलच.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार