सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाग नदी संवर्धन प्रकल्पाला शासनाची मंजुरी

ना.नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे नाग नदी संवर्धन प्रकल्पाला शासनाची मंजुरी प्रकल्पावर 2117 कोटी खर्च करणार.

Sudarshan MH
  • Mar 3 2021 9:18AM
नाग नदी संवर्धन प्रकल्पाला शासनाची मंजुरी  नितिन गडकरी
  ना. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे
नाग नदी संवर्धन प्रकल्पाला शासनाची मंजुरी
प्रकल्पावर 2117 कोटी खर्च करणार
ज्या नाग नदीवरून नागपूरची ओळख आहे, त्या नाग नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठीच्या प्रकल्पाला आज केंद्र शासनाने मंजुरी दिली. केंद्रीय महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प मंजूर झाला.
नाग नदी संवर्धन प्रकल्प  2117.54 कोटी रुपयांचा असून राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत ही मंजुरी मिळाली आहे. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा ना. गडकरी यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणारी ही नदी सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातून निघणार्‍या घाण पाण्यामुळे प्रचंड प्रदूषित आहे. आज जागतिक बँकेच्या चमूसोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ना. गडकरी यांनी ही घोषणा केली. नागपूर महापालिकेचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय या प्रकल्पाची अमलबजावणी करणार आहेत.
नाग नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी, कचरा टाकला जातो. तसेच या नदीला मिळणारे नाले आणि उपनद्या यातून होणारे प्रदूषणही कमी करण्यासाठी संचालनालय काम करणार आहे.
नाग नदीचे पाणी स्वच्छ व्हावे व प्रदूषण पूर्णत: दूर व्हावे यासाठी ना.गडकरी यांचे अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. या नदीच्या पाण्यातून जलवाहतूक व्हावी, असाही त्यांचा प्रयत्न आहे. आपण स्वत: अंबाझरी ते पारडी या दरम्यान नदीतून नावेने जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार