सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात शेतीवर संकट

मुंबई: पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या; महागाईची भीती मोसमी पावसाने अंदाजाच्या एक दिवस आधीच राज्यात दमदार हजेरी लावली.

Sudarshan MH
  • Jun 27 2021 12:19PM


मुंबई: पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या; महागाईची भीती मोसमी पावसाने अंदाजाच्या एक दिवस आधीच राज्यात दमदार हजेरी लावली. आगमन धडाक्यात साजरे केल्यानंतर दोन आठवडे राज्याच्या अनेक भागांत चांगला पाऊस झाला. परंतु गेला आठवडाभर त्याने पाठ फिरवल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी, शेतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. प्रमुख पिकांसह अन्य शेतमालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास महागाईची भीती आहे.

करोना विषाणू साथनियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा इशाराही दिला गेला. अशा नैराश्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोसमी पाऊस वेळेत आला. आगमनाच्या सत्रात तो जोरदार बरसल्याने शेतकरी सुखावला होता. त्याचबरोबर यंदा चांगले पीकपाणी येण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले होते. परंतु दोन आठवड्यांनंतर पावसाचा जोर ओसरला. आता आठवड्याभरापासून तो गायब  असल्यामुळे पेरण्या अपूर्ण राहिल्या आहेत. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग आतुरतेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता तर पाऊस आणखी आठवडाभर पडण्याची शक्यता  धूसर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये यंदा मृगाच्या मुहुर्तावर पेरण्या आटोपतील असा अंदाज होता, मात्र अखेरच्या चरणात पावसाने दडी मारली आहे. तालीच्या आणि कसदार रानात उगवलेल्या पेरण्यांमध्ये आता कोळपणीची कामेही चालू झाली आहेत. मात्र हलक्या रानातील पिके माना टाकू लागली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरलेले बियाणे साळुंकी, मोर, उंदीर फस्त करू लागले आहेत.
विदर्भात सरासरी ३० ते ४० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. नागपूर विभागाच्या कृषी सहसंचालकांनी मात्र सरासरी ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. तूर, मूग, कापूस पिकांची पेरणी सुरू आहे, तर धानासाठी रोपवाटिका तयार केल्या जात आहेत.
मराठवाड्यात काही मोजक्या मंडळात पडलेल्या पावसामुळे आठ जिल्ह्यांत आता पेरणी करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. या वर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असली तरी पेरणीसाठी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी काळजीत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत पाच लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तेलबियांची ६.१९ टक्के, तृणधान्य ७.८९, कडधान्य ८.३६ टक्के  पेरणी झाली आहे. धुळे जिल्ह््यात वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत निम्माही पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात केवळ १३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार