सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मृत्युंजय दूत करणार आता अपघात ग्रस्तांची मदत..

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी महामार्गावर मृत्युंजय दूत. राज्य महामार्ग पोलीस विभागामार्फत १ मार्चपासून योजनेला सुरुवात.

Sudarshan MH
  • Feb 28 2021 4:40PM
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी महामार्गावर मृत्युंजय दूत. राज्य महामार्ग पोलीस विभागामार्फत १ मार्चपासून योजनेला सुरुवात...रस्ते अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य महामार्ग पोलिस विभागांमार्फत हायवे मृत्युंजय दूत ही योजना राज्य महामार्गावर ठिकठिकाणी अपग्रस्तांच्या मदतीसाठी मृत्युंजय देवदूत आपणास बघायला मिळतील. देशाला प्रत्येक वर्षी सुमारे दीड लाख नागरिकांना अपघाती मृत्यू होतो. रस्ता अपघात झाल्यावर या अपघातग्रस्तांना मदत व वैद्यकीय मदत मिळत नसल्याने मृत्यू होतो, असे एका अहवालातून पुढे आले आहे. अपघात झाल्यावर अनेकदा जखमी रस्त्यावर रक्ताच्या विव्हळत पडून राहतो. मदतीची विनवणी करतो. परंतु उगीच पोलिसांच्या कारवाईला कोण सामोरे जाईल, असा विचार करून कोणी मदत नाही. हा प्रकार लक्षात घेऊन जखमींना योग्य आणि तातडी वैद्यकीय सुविधा मिळून देण्यासाठी ठिकठिकाणी सेवाभावी वृत्तीची प्रशिक्षित मंडळींना तयार करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील महामार्गावर हायवे मृत्युंजय देवदूत या उपक्रमाची योजना पोलीस दलासमोर ठेवली. शिर्षस्थ पातळीवरून तिला मंजुरी मिळाल्याने १ मार्च २०२१ पासून या उपक्रमाला सुरुवात केली जाईल. जास्तीत जास्त अपघातग्रस्त नागरिकांना मदत करून त्याचे जीव वाचविनाऱ्या दुताच्या कामाची नोंद घेतली जाईल. देवदूताना मिळणार प्रशिक्षण महामार्गवरील पेट्रोल पंप, हॉटेल्स, ढाबे, आणि मॉल्समधील कर्मचारी व महामार्गावरील गावातील सेवाभावी व्यक्ती, असे प्रत्येकी पाच जणांचा ग्रुप त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करून निवडला जाईल. त्यांना सरकारी, निमसरकारी आणि स्वयंसेवी संस्थेमार्फत अपघातग्रस्तांना कसे हाताळावे, कसे उचलून स्ट्रेचरवर, वाहनावर, रुग्णवाहिकेत ठेवावे, प्रथमोपचार कसा करावा त्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांच्याकडे प्रथमोपचाराची किट, स्ट्रेचर आणि जवळील हॉस्पिटलची नावे, रुग्णवाहिकेचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल. त्यांना ओळखपत्र दिले जाईल आणि मृत्युंजय असे संबोधण्यात येईल...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार