सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

3 लाखाहून अधिक कोंबड्यांची झाली कत्तल; आणखी 8 पोल्ट्री फार्मचा अहवाल पॉझिटिव्ह

नंदुरबार : नवापूर येथील बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात कुक्कुट

Nandurbar. MH
  • Feb 10 2021 8:06PM
नंदुरबार : नवापूर येथील बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात कुक्कुट पक्ष्यांच्या कलिंगचे काम वेगाने सुरू असून मागील चार दिवसात सव्वा तीन लाखाहून अधिक कोंबड्यांची कत्तल करण्यात आली. दरम्यान आज आणखी आठ पोल्ट्री फार्म वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कत्तलीचे काम आठवड्यापेक्षा अधिक दिवस चालवले जाऊ शकते.
        एकूण 90 पथके नवापुरात सध्या कार्यरत आहेत. मागील चार दिवसात 3 लाख 28 हजार 373 कुक्कुट पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले. काल 1 लाख 12 हजार 400 कुक्कुट पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले. दरम्यान आज दि.10 फेब्रुवारी 2021रोजी आणखी 8 पोल्ट्री फार्म चा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. बर्ड फ्लू लागण झालेल्या एकूण पोल्ट्री फार्म ची संख्या यामुळेे 16 झाली. पैकी दहा पोल्ट्री फार्म मधील सव्वातीन लाखाहून अधिक कोंबड्या मारण्यात आल्या आहेत. 
      जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार मंदार कुलकर्णी आदी स्वतः लक्ष ठेवून आहेत.
     शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. विल्हेवाट लावताना पक्षी आणि अंडी यांची योग्यरितीने नोंद घेण्यात येत असून नवापूर शहराभोवतीत असलेल्या पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्ष्यांची देखील माहिती घेण्यात येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार