सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जि.प.आस्थापनेवरील आरोग्य कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षित मागण्या मंजुर

आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे जि.प.प्रशासनाचे आभार

Sudarshan MH
  • Nov 5 2020 7:09PM

 सुदर्शन  न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार-जिल्हा परिषद आस्थापनेवरील आरोग्य विभाग व हिवताप विभागातील कर्मचार्‍यांचे बरेच मागण्या खासदार डॉ.हिनाताई गावीत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मान्य केल्याचे आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद आस्थापनेवरील आरोग्य कर्मचार्‍यांच्या तसेच हिवताप विभागातील कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी महासंघाने खासदार डॉ.हिनाताई गावीत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना आरोग्य कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देवून चर्चा केली. चर्चेत आदिवासी सेवक तथा महासंघाचे नेते डॉ.कांतीलाल टाटीया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र ढोले, महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे तसेच महासंघाचे कार्यकर्ते सतिष जाधव, गणेश खेडेकर, विशाल मोघे, संदीप पाटील, नितीन पवार, एस.एस.पाटील, संतोष कुचरे, जितेंद्र गरुड आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांचा पगार तसेच दिवाळी बोनस रुपये बारा हजार पाचशे दिवाळीपूर्वी सर्वांना अदा करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यु) यांना आरोग्य सहाय्यक या सर्व रिक्त पदांवर आणि ए.एन.एम.आरोग्य सेविका यांना देखील एलएचव्ही आरोग्य सहाय्यीका या सर्व रिक्त पदावर दिपावळीनंतर मोहिम राबवून पदोन्नती देण्यात येणार आहे. सर्व डीसीपीएसधारक आरोग्य कर्मचार्‍यांना त्यांचा कपातीचा हिशोब देण्याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. शिवाय सुधारीत सेवांतर्गत आश्‍वासीत प्रगती योजना १०-२०-३० वर्षाची कालबद्ध पदोन्नती देण्याची कार्यवाही अंगिकारण्यात येणार आहे. हिवताप विभागातील १ जानेवारी २०१६ पूर्वी एकस्तर वेतनश्रेणीत वेतन घेणार्‍या सर्व हिवताप आस्थापनेवरील कर्मचार्‍यांना वेतन निश्‍चितीमधील त्रुटी दूर करुन सुधारीत वेतन निश्‍चिती लागू करण्यात येणार आहे. शिवाय सर्व हिवताप कर्मचार्‍यांना सुधारीत सेवांतर्गत आश्‍वासीत प्रगती योजना १०-२०-३० वर्षाची कालबद्ध पदोन्नती या महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे. फरक देखील लवकरच टप्पाटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र ढोले यांनी संागितले.
कर्मचार्‍यांच्या बर्‍याच वर्षानुवर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मागण्या मंजुर केल्याने महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी मु.का.अ.रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र ढोले तसेच खासदार डॉ.हिनाताई गावीत, डॉ.कांतीलाल टाटीया, महासंघाचे नेते यांना धन्यवाद देवून आभार मानले.



 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार