सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अनिल देशमुख यांच्या नंतर आता मंत्री अनिल परब यांच्या विरूद्ध लेटर बाॅम्ब; चौकशीचे आदेश

मुंबईः प्रादेशिक परिवहन विभागात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Sudarshan MH
  • May 29 2021 4:58PM

मुंबईः प्रादेशिक परिवहन विभागात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आरटीओतील वाहन निरीक्षकानेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील सहा बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. या प्रकरणावरुन आता राजकारणही तापलं आहे. 

नाशिकमध्ये नियुक्ती असलेल्या गजेंद्र पाटील या मोटार वाहन निरीक्षकाने आरटीओतील गैरव्यवहार प्रकरणी थेट पंचवटी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. धुळे येथे कार्यरत असताना निलंबनाच्या कारवाईला सामोरे गेलेल्या पाटील यांना सध्या नाशिक मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मेलवर आणि नंतर प्रत्यक्ष हजर होत, आरटीओमध्ये बदलीच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांचे मनी लाँड्रिंग होत असल्याचा आरोप केला
काय आहेत आरोप?
आरटीओमध्ये सध्या बदल्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतात. परिवहन आयुक्तालय हे मुख्य केंद्र असून, संकलित झालेल्या काळ्या पैशांमध्ये थेट परिवहनमंत्र्याचा संबंध असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याशिवाय नाशिकसह मुंबईतील सहा मोठ्या अधिकाऱ्यांचा उल्लेख तक्रार अर्जामध्ये करण्यात आला आहे. संघटित पद्धतीने चेकपोस्टवर बदल्या होतात. बीएस फोर या बंद पडलेल्या वाहनांची नोंदणी केली जाते, वाहतूकदारांना हाताशी धरून बसेस, तसेच मालट्रक पास होतात. यात मोठा काळा पैसा निर्माण होतो. याशिवाय इतर अनेक गंभीर आरोप संबंधित वाहन निरीक्षकाने केले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार