सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ना. गडकरी यांचा उद्योग व्यापार मंडळाशी ई संवाद

देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योग-व्यापार्‍यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पण कोविड-19च्या काळात जोपर्यंत सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढणार नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेला गती येणार नाही.

Snehal Joshi .
  • Aug 10 2020 6:57PM
देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योग-व्यापार्‍यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पण कोविड-19च्या काळात जोपर्यंत सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढणार नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेला गती येणार नाही. यासाठी बाजारात खेळते भांडवल मोठ्या प्रमाणात येणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
उद्योग व्यापारी मंडळाशी 39 व्या राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- संकटांवर मात करून पुढे जाण्याचा आपला इतिहास आहे. कोविडच्या संकटावरही आपण मात करूच. कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक युध्दाचा सामना करून त्यावरही मात करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची घोषणा केली आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही मेहनत करीत आहोत. हे मिशन कठीण असले तरी अशक्य नाही. आज आपल्या देशात कोणत्याही गोष्टींची कमी नाही. देश धनवान आहे, पण जनता गरीब आहे. त्यांची क्रयशक्ती कमी आहे. ती वाढविण्यासाठी उद्योगांमध्ये परकीय भांडवल-गुंतवणूक आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. यामुळे बाजारात खेळते भांडवल उपलब्ध होईल व रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण झाला तर गरीब जनतेच्या हातात पैसे येतील, त्यानंतरच त्यांची क्रयशक्ती वाढेल, असेही ते म्हणाले.
सामाजिक-आर्थिक मागास असलेल्या भागाच्या विकासावर ना. गडकरी यांनी भर दिला. वेळेनुसार
आपल्याला व्यापार-उद्योगात बदल करावे लागतील, नवीन बदल स्वीकारावे लागतील व पुढे जावे लागेल. दररोज येणारे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. तंत्रज्ञानात होणारे बदल स्वीकारावे लागतील. यासाठी सहकार्य, समन्वय आणि संवाद याची गरज आहे. 21 व्या शतकात सर्वात मोठे भांडवल विश्वसनीयता, प्रामाणिकता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, वेळेवर सेवा व डिजिटलायझेशन राहणार आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार