सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

म न पा चा कार्यक्रमात गडकरी यांनी केले तुकाराम मुंडे यांचे कौतुक. म्हणाले कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं.

नितीन गडकरी हे शनिवारी नागपूर मनपाने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरातील आमदारांनी चांगले काम केल्याची पोचपावती दिली.

Snehal Joshi .
  • Jan 30 2021 11:01PM
नागपूर: कोरोनाच्या काळात नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगले काम केले, अशी प्रशंसा नितीन गडकरी  यांनी केली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. यामध्ये भाजपचे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी आणि संदीप जोशी आघाडीवर होते. याच वादातून तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदलीही झाली होती. मात्र, आज नितीन गडकरी यांनीच तुकाराम मुंढे यांचे कौतुक केल्याने अनेकांना मिश्किल हसू आले. नितीन गडकरी हे शनिवारी नागपूर मनपाने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरातील आमदारांनी चांगले काम केल्याची पोचपावती दिली. तसेच महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा व जन शक्तीच्या माध्यमातून शहिदांच्या नावाने हॉस्पिटल चालविण्याचे आव्हान केल्यानंतर आगामी काळात नागपूर महानगरपालिकेने औषधी बँक तयार करावी. या बँकेत अत्यावश्यक औषधांचा साठा असावा, ही काळाची गरज आहे. अशी सूचनाही यावेळी गडकरी यांनी केली. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार