फुटाळा संगीत कारंज्यांमुळे नागपूर जगाच्या नकाशावर : ना. गडकरी
फुटाळा संगीत कारंज्यांमुळे
नागपूर जगाच्या नकाशावर : ना. गडकरी
छत्रपती चौक ते मानकापूर जंक्शन रस्त्याचे लोकार्पण
शहराच्या विकासासोबतच रोजगार निर्मितीही करणार
नागपूर लोकसभा क्षेत्रात 80 हजार कोटींची कामे
फुटाळा तलाव येथे येत्या 15 ऑगस्टपर्यंत होणार्या जागतिक दर्जाच्या संगीत कारंज्यांमुळे नागपूर हे जगाच्या नकाशावर जाणार असून शहराच्या चौफेर विकासासोबत रोजगार निर्मितीही करणार असून मिहानमध्ये आतापर्यंत 56 हजार तरुण मुला-मुलींना रोजगार मिळाला असून येत्या 3 वर्षात एक लाखांपर्यंत मुला-मुलींना रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
छत्रपती चौक ते मानकापूर जंक्शन या रस्त्याचे लोकार्पण आज ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, माजी आ. सुधाकर देशमुख, माजी आ. अनिल सोले, उपमहापौर मनीषा धावडे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- पन्नास वर्षात नाही झाली तेवढी कामे गेल्या 5 वर्षात आम्ही भाजपाच्या नेतृत्वातील शासनाने केली आहे. या सर्व कामाचे श्रेय जनतेचे आहे. जनतेचे प्रेम, विश्वास आशीर्वाद द्या म्हणजे मनपाचे एक इंजीन आणि एक केंद्राचे इंजिन मिळून विकास करू, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- आज लोकार्पण झालेल्या रिंगरोडला हरित मार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या मार्गावर लागणार्या झाडांना जगविण्याची जबाबदारी जनतेने व नागरिकांनी घ्यावी. 28 किमीच्या या रस्त्यासाठी फॅक्टरीत तयार झालेल्या सिमेंटच्या स्लॅब रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या शहराच्या चारही भागात चौफेर विकास सुरु आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस
रिंगरोडला 6 पदरी करून काम पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले- हा संपूर्ण सिमेंटचा रोड झाल्यामुळे खड्डे पडणार नाही, देखभाल दुरुस्ती नाही. 50 वर्षे या रस्त्याकडे पाहण्याची गरज भासणार नाही. रस्त्यासोबतच हिरवळ निर्माण करण्याचे कामही सुरु आहे. ना. गडकरी यांनी विविध योजना शहरात आणल्या. वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून नागपूर हे देशातील आधुनिक शहर झाले. शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध संस्था येथे आणल्या. एक आंतरराष्ट्रीय नामांकन शहराला मिळाले. डबल डेकर ही देशातील पहिली अभिनव संकल्पना शहरात राबविली. शहराचे चित्र बदलण्याच्या माध्यमातून व पर्यटनातून रोजगाराच्या संधीही शहरात उपलब्ध होणार आहे. रोजगार देणारे उद्योगही नागपुरात आणण्याचे काम ना. गडकरींच्या नेतृत्वात होत आहे. झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले. समाजातील सर्व स्तराच्या लोकांसाठी परिवर्तन या शहरात ना. गडकरींच्या नेतृत्वात झाले असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प