सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सामाजिक-आर्थिक परिवर्तनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : ना. गडकरी

सामाजिक-आर्थिक परिवर्तनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : ना. गडकरी टीकेएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा रौप्य महोत्सव

Snehal Joshi .
  • Jan 23 2021 8:48PM
देशाच्या मागास क्षेत्रात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची महत्त्चाची भूमिका आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
टीकेएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलाम, या संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- कोविड-19 मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसह सर्व औद्योगिक क्षेत्रापुढे नवीन आव्हाने निर्माण झाली. पण नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, यामुळे उद्योग आता सावरत असून अर्थव्यवस्थेलाही हळूहळू चालना मिळत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठ़ी व्यवस्थापन क्षेत्रात प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
अनेक विषयांचे प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. पण उद्योजकता निर्माण करणारी एकही संस्था सध्या नाही. उद्योग वाढले तरच रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मिती झाली तरच गरिबी निर्मूलन होईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- उद्योग, सेवाक्षेत्र, कृषी आणि कृषी मालावर आधारित उद्योग या चार बाबी कृषी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार करण्यासाठी आयात कमी करून निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आज 8 लाख कोटींचे क्रूड तेल आयात करण्याचे मोठे आव्हान देशासमोर असताना कृषी क्षेत्रापासून जैविक इंधन निर्मिती ही देशाची गरज झाली आहे, असेही ते म्हणाले.
देशातील विविध क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या चांगला काळ असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- पायाभूत सुविधांच्या विकासात यापुढे लोकसहभाग महत्त्वाचा आहे. टीओटी आणि पीपीपीमुळे सर्व क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास शक्य आहे. हे सर्व करताना योग्य नियोजन करण्यासाठी योग्य दृष्टिकोनाची गरज आहे. तसेच गावांचा, कृषी क्षेत्राचा व आदिवासी क्षेत्राच्या विकासास प्राधान्य मिळाले पाहिजे. नवीन पिढीने व व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार