सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रचला विक्रम

नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात एका आठवड्यात 534 किमी महामार्गांचे बांधकाम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रचला विक्रम

Snehal Joshi .
  • Jan 20 2021 11:16PM
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात केंद्र शासनाच्या  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते बांधकामाचा नवा विक्रम स्थापित केला आहे. 8 जानेवारी 2021 पासून 21 जानेवारी 2021 या आठवडाभरात देशात 534 किलोमीटरचे महामार्गांचे बांधकाम करण्यात आले आहे. आजपर्यंतच्या रस्ते बांधकामामध्ये हा विक्रम ठरला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल 2020 ते 15 जानेवारी 2021 या दरम्यान 8169 किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधून पूर्ण केले आहे. या महामार्ग बांधकामाची गती प्रत्येक दिवशी 28.16 किमी एवढी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीदरम्यान महामार्ग बांधकामाची गती प्रतिदिन 26.11 किलोमीटर एवढी होती. येत्या 31 मार्चपर्यंत महामार्ग बांधकामाची ही गती अधिक वाढवून 11 हजार किलोमीटरचे लक्ष्य या मंत्रालयाने निर्धारित केले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल 2020 ते 15 जानेवारी 2021 या दरम्यान 7597 किलोमीटरचे महामार्ग प्रकल्पाच्या निविदा निश्चित केल्या आहेत. तसेच सन 2019 ते 20 मध्ये याच कालावधीत 3474 किलोमीटर महामार्ग प्रकल्पांच्या निविदा निश्चित केल्या होत्या. सन 2019-20 मध्ये एकूण 8948 किलोमीटर महामार्ग बांधकामाच्या निविदा निश्चित करण्यात आल्या होत्या. ना. गडकरी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात 10237 किलोमीटरचे महामार्ग बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
सन 2020 च्या सुरुवातीला कोविड 19 मुळे मंत्रालयाने ठरवलेले महामार्ग बांधकामाचे लक्ष्य पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण मंत्रालयाने विशेष प्रयत्न करून घेतलेल्या पुढाकारामुळे बांधकामाची गती प्रचंड वाढली. महामार्गाची उर्वरित बांधकामाची गती पुढील काळात निश्चितपणे वाढेल अशी आशा मंत्रालयाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार