सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कृषी विधेयक शेतकरी हिताचेच : ना.गडकरी आंदोलन भडकविण्याचे प्रयत्न

केंद्र शासनाने आणलेले कृषी विधेयक हे शेतकरी हिताचेच असून या विधेयकात करण्यात आलेल्या प्रावधानामुळे शेतकर्‍यांचेच हित साधले जाणार आहे. शेतकर्‍यांचे जे आंदोलन सध्या सुरु आहे, या आंदोलनाला राजकीय रंग देऊन भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचे मत राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Snehal Joshi .
  • Dec 14 2020 11:39PM
केंद्र शासनाने आणलेले कृषी विधेयक हे शेतकरी हिताचेच असून या विधेयकात करण्यात आलेल्या प्रावधानामुळे शेतकर्‍यांचेच हित साधले जाणार आहे. शेतकर्‍यांचे जे आंदोलन सध्या सुरु आहे, या आंदोलनाला राजकीय रंग देऊन भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचे मत राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
एक वृत्तवाहिनीवर यासंदर्भात आपले मत व्यक्त करताना ना. गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले- कृषी कायद्याबद्दल शेतकर्‍यांमध्ये भ्रम पसरविला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने आतापर्यंत ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. ‘कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग’बद्दल गैरसमज पसरविले जात आहे. यामुळे शेतकर्‍याच्या शेतीचा सात बाराही बदलणार नाही आणि कुणी त्याच्या जमिनीवर कब्जाही करणार नाही. आजही बटाईने शेती केली जातच आहे. शेतकर्‍याजवळ बी-बियाणे, खते, औषधे, ड्रिपसाठी पैसा नाही. विदर्भातील शेतकरी तर आत्महत्या करीत आहे. अशा स्थितीत कुणी पैसा लावून शेतकर्‍याला नफ्यात अर्धा वाटा देत असेल तर शेतकर्‍याचाच फायदा आहे, असेही ते म्हणाले.
नवीन कायद्यामुळे शेतकरी दलालीपासून बचावणार आहे, असे सांगताना ते म्हणाले- किमान आधारभूत किंमत ही शासनाने दरवर्षी वाढवली आहे. शेतकर्‍यांना नेहमीच संरक्षण दिले आहे. शेतकर्‍यांसाठी अनेक योजना आणून शेतकर्‍याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न मोदी शासनाने केले आहे. गेल्या वर्षी 36 हजार कोटींचा शेतकर्‍यांचा कापूस शासनाने खरेदी केला. 13 लाख कोटीच्या कर्जाचे प्रावधान केले आहे. शेतकरी हिताचेच हे निर्णय आहेत. पण आंदोलन वेगळ्या दिेशेने वळविणे आणि शेतकर्‍याची दिशाभूल केली जात आहे, हे राजकारण शेतकर्‍यांनी समजून घ्यावे. शेतकर्‍यांच्या समस्या या मनमोकळ्या चर्चेने सुटणार्‍या आहेत. पण आंदोलन चिघळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार