सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गरिबी-बेरोजगारी देशासमोरील मोठी समस्या : ना. गडकरी

गरिबी-बेरोजगारी देशासमोरील मोठी समस्या : ना. गडकरी ‘फिकी’ची 93 वी वार्षिक परिषद

Snehal Joshi .
  • Dec 14 2020 11:27PM
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेले संकट हळूहळू दूर होत असतानाच आज देशासमोर बेरोजगारीची मोठी समस्या आहे. बेरोजगारीमुळेच गरिबीचा सामना लाखो कुटुंबांना करावा लागत आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेमुळेच या दोन्ही समस्या सुटणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘फिकी’च्या 93 व्या वार्षिक परिषदेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी तसेच 115 मागास जिल्ह्यांचा जीडीपी वाढावा अशी अपेक्षा व्यक्त करताना सांगितले की, रोजगाराची निर्मिती आणि गरिबीचे निर्मूलन यासाठी शासनाचे प्राधान्य आहे. कृषी क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आज 14 ते 16 टक्के आहे. हे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत होण्यासाठी कृषी क्षेत्राचा जीडीपी 25 टक्केपर्यंत न्यावा लागणार आहे. आर्थिक, सामजिक, शैक्षणिक दृष्टीने मागास असलेल्या ग्रामीण, कृषी आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था 80 हजार कोटींहून 5 लाख कोटींपर्यंत नेणे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा ग्रामीण भागातील सूक्ष्म व मध्यम व लघु उद्योगांच्या उत्पादनांना बाजारपेठ, निर्यातयोग्य उत्पादन आणि योग्य भाव मिळेल.
रोजगाराच्या शोधार्थ विकास नसलेल्या ग्रामीण भागातील लोक शहरांकडे धाव घेत आहेत. परिणामी शहरातील सोयी सुविधांवर त्याचा दबाव येऊन अनेक समस्या निर्माण होत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- शहरात स्थानांतरित होणार्‍या लोकांचे लोंढे थांबवायचे असतील तर ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. आज देशात 1 लाख कोटींचे कच्चे तेल आयात केले जाते. जैविक इंधन निर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कच्चा माल उपलब्ध असताना त्याचा वापर झाला पाहिजे. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीला पर्याय निर्माण होईल. इलेक्ट्रिक बस, कार आम्ही रस्त्यावर आणणार आहोत. पण त्याचे सुटे भाग मात्र चीनमधून आयात होतात. हे सुटे भाग अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा विकास करून बनविले तर आपण या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ. देशातील सर्वच क्षेत्रात आयातीला पर्याय निर्माण वस्तू बनविण्याची क्षमता आहे आणि संधीही आहे, याकडेही त्यांनी आपले लक्ष वेधले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार