सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वहाणा घातलेला प्रवासी विठ्ठल

तर मग कोल्हापूर मिरज तिकटी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यास नक्की जा व मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर नक्की या गोष्टी निरखून पहा.

Snehal Joshi .
  • Feb 20 2021 11:17PM

आपण विठ्ठल मंदिरात कित्येक वेळी जात असतो. जेंव्हा जेंव्हा जाऊ त्याच्या पायावर डोके टेकून पाया पडलो असतो पण आपल्यापैकी कित्येकांनी त्याने पायामध्ये काय परीधान केलय? हे निरखून कधीच पाहिले नसेल. कोल्हापूर मिरज तिकटी येथील विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल पुजारी जोशींच्या बरोबर बोलताना त्यांनी सांगितले की, हेमाडपंथी बाराव्या शतकातील हे विठ्ठल मंदिर प्रवासी विठ्ठल मंदिर म्हणून ओळखले जाते.

प्रवासी या शब्दामागे अशी आख्यायिका आहे की, विठ्ठल नंदवाळ गावातून प्रवास करीत बारा पर्यंत कोल्हापूरमध्ये या मंदिरात येतो आणि येथून पुढे पंढरपूरला जातो. या मंदिराच्या आतील मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल त्याच्या राही व रुक्मिणी दोन्ही पत्नींसोबत आहे असे हे एकमेव मंदिर असेल. तसेच तीनही मूर्तींच्या पायामध्ये वहाणा आहेत. या वहाणा म्हणजे हे प्रवास करताहेत याचे प्रतीक अशी वहाणा घातलेली विठ्ठलाची मुर्ती इतर कोठेच मिळणार नाही.

सेच मंदिराच्या शेजारी राम मंदिर आहे. ही मूर्ती इतर ठिकाणच्या मुर्तीपेक्षा वेगळी आहे, प्रत्येक मंदिरात तुम्हाला राम-लक्ष्मण-सीता यांची उभारलेली मूर्ती दिसेल पण या मंदिरात राम बसलेला आहे व त्याच्या डाव्या मांडीवर सीता माता बसलेली आहे.

तर मग कोल्हापूर मिरज तिकटी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यास नक्की जा व मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर नक्की या गोष्टी निरखून पहा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार