सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचा योग दिनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

s.ranjankar
  • Jun 21 2021 3:13PM



लातूर,दि.21- दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या कार्यक्रमाला फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
       क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, सहाय्यक पुरवठा अधिकारी महेश सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
          प्रारंभी आयुष डॉक्टर विकास पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व त्यानंतर योगशिक्षक श्रुतिकांत  ठाकुर व सोनाली मस्कावाड यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. क्रीडा संकुल च्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या योग प्रात्यक्षिके कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी व काही विद्यार्थी कोरोनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी महोदय यांच्या फेसबुक पेजवर हा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी लाईव्ह दाखवण्यात आला; या कार्यक्रमाला ही नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार