सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निमगूळ ठरले होते हॉटस्पॉट, सुमारे ५० जणांचा कोरोनाने घेतला बळी.कोरोनाग्रस्त झालेले परिवारांना शासनाने आर्थिक मदत द्यावी!

शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावात अनेकांना कोरोनाची बाधा झाली.

Nandurbar MH
  • Jul 10 2021 10:16AM


शिंदखेडा  तालुक्यातील निमगूळ गावात अनेकांना कोरोनाची बाधा झाली.  निमगूळ गावातील  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  थोडेथोडके नव्हे तर तब्बल ५० ते ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, या कोरोनाग्रस्तांची शासनासह प्रशासनानेही दखल घेतलेली नाही. या कोरोनाग्रस्तांच्या पोरके झालेले  कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
निमगूळ या गावातील बहुतांश घरांमधील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. उपचारासाठी काहींनी धुळे तर काहींनी नंदुरबार, सुरत येथील दवाखाने गाठले. यात लाखो रुपये खर्च झाला. काहीनी कोरोनावर मात केली तर काहींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू हे निमगूळलाच झालेले आहेत.

असे असतानाही प्रशासनातर्फे गावात सर्व्हे करण्यात आलेला नाही. प्रशासनाप्रमाणे शासनाचेही या गावाकडे दुर्लक्षच झालेले आहे. कोरोनाचा उपचार करण्यासाठी अनेकांनी लाखो रुपयांचा खर्च केला. काहीजण तर कर्जबाजारी झालेले आहेत तर कोरोनावर उपचार करण्यासाठी अनेकाना लाखोंचा खर्च झाला. त्यामुळे अनेकजण कर्जबाजारी झालेले असतांना. अशांना  परिस्थितीतून सावरण्यासाठी मदतीची गरज आहे.

या कोरोनाग्रस्त परिवारांना शासनाने थोडीफार आर्थिक मदत देणे गरजेचे होते. मात्र, शासनानेही याकडे पाठ फिरवली आहे. कोरोनानंतर गावात काही पक्षाच्या लोकप्रतिनिधीने गावाला भेट दिली नाही, याचेही शल्य ग्रामस्थांना आहे. आज जरी गाव कोरोनातून सावरले असले तरी कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या परिवाराला शासनाने थोडीफार आर्थिक मदत द्यावी,व शासनाने लावकरात लवकर  निर्णय घ्यावा. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार