सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कचरा संकलनाचा खाजगी ठेका बंद करा ९ ऑगस्टला सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

नंदुरबार-पालिका क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना कचरा संकलनाचे काम देण्यात आले आहे.

Nandurbar MH
  • Aug 7 2021 4:52PM

नंदुरबार-पालिका क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना कचरा संकलनाचे काम देण्यात आले आहे. हा ठेका बंद करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्टला राज्यातील सर्व पालकांचे सफाई कामगार एक दिवसाचा लाक्षणिक बंद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिका सफाई कामगार सहभागी होतील, अशी माहिती सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार यांनी दिली.
याबाबत श्री.थनवार यांनी सांगितले, राज्यातील सफाई कामगारांच्या विविध समस्या आहेत. या समस्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी संघटनेतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य विभागाच्या बारा मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. मात्र अद्याप उपयोग झालेला नाही. यात पालिका क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना कचरा संकलनाचे काम दिले जाते ते बंद करण्यात यावे. लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात १ लाख सफाई कामगारांच्या नवीन पदांची गरज आहे ती निर्मिती करून त्यावर भरती करण्यात यावी. कर्मचार्‍यांच्या वेतनाचा अनुदान शासनाकडून पालिकेला मिळावे. यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील पालिका सफाई कर्मचारी कामगार ९ ऑगस्टला लाक्षणिक काम बंद आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर, तळोदा, शहादा पालिकांचे कर्मचारी आणि धडगाव नगरपंचायतचे पालिका सफाई कामगार यात सहभागी होतील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री.थनवार यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार