सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काही पक्षांसाठी गोवा केवळ राजकीय महत्वकांक्षेचे लॉंचिंग पॅड ! नाव न घेता पंतप्रधानांचा 'आप','तृणमुल' ला टोला

सभेला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, गोवाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होते.परंतु, यंदा तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी या राज्यात नवे राजकीय खेळाडू म्हणून उदयास आले आहेत, जेथे परंपरागतपणे काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रमुख, राष्ट्रीय स्तरावरील पक्ष रिंगणात होते. "काही राजकीय पक्ष गोवा आणि गोव्याबद्दल काहीही माहिती नसताना त्यांच्या स्वतःच्या आकांक्षांसाठी लाँच पॅड मानत आहेत," अशी टीका पंतप्रधानांनी केली.

Snehal Joshi .
  • Feb 11 2022 6:40AM

पणजी, गोवा

काही राजकीय पक्ष गोव्याला केवळ आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठीचा लॉंचिंग पॅड समजत आहेत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता आम आदमी पार्टी आणि तृणमुल काँग्रेस वर गुरुवारी म्हापसा येथील जाहीर सभेतून केली. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी  पंतप्रधानांच्या सभेला हजारो गोवेकरांनी हजेरी लावली होती.'नरेंद्र मोदी जिंदाबाद, हर-हर मोदी 'अश्या घोषणानीं नागरिकांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

सभेला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, गोवाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होते.परंतु, यंदा तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी या राज्यात नवे राजकीय खेळाडू म्हणून उदयास आले आहेत, जेथे परंपरागतपणे काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रमुख, राष्ट्रीय स्तरावरील पक्ष रिंगणात होते. "काही राजकीय पक्ष गोवा आणि गोव्याबद्दल काहीही माहिती नसताना त्यांच्या स्वतःच्या आकांक्षांसाठी लाँच पॅड मानत आहेत," अशी टीका पंतप्रधानांनी केली.

गोव्यातील जनतेला त्यांच्यासाठी कुठली कामे करणारे सरकार हवे आहे, हे या पक्षांना ठाऊक नाही. त्यामुळेच ते त्यांच्या जाहीरनाम्यात आश्वासने देत होते, जी भाजप सरकारने पूर्ण केली आहे, असा दावा त्यांनी केला.गोव्यातील जनतेने या पक्षांना त्यांची "हिंसा आणि दंगलीची संस्कृती" येथे आणू नका, असे मोदींना सांगितले आहे. ते पुढे म्हणालेकी, गेल्या काही वर्षांत, देशाने कुटुंब-केंद्रित पक्ष, जात आणि पंथ-विशिष्ट पक्ष, व्यक्ती-केंद्रित पक्ष पाहिले आहेत आणि नंतर त्यांनी भाजप देखील पाहिले आहे "ज्यांची सर्वात मोठी ताकद त्याचे कार्यकर्ते आहेत," असे पंतप्रधान म्हणाले. भाजपसाठी सत्तेचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी नसून देशसेवेची संधी आहे, असेही ते म्हणाले.

व्हिजन किंवा अजेंडा नसणारे सरकार मतदारांना नको. या पक्षांना गोवा समजत नाही. ज्यांना गोवा समजत नाही असे पक्ष येथे आले आहे. अशात निवडणुकीत कुठल्या घोषणा करायच्या हे देखील त्यांना उमजले नसल्याने ते अंधारात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जी आश्वासने अगोदरच भाजप ने पूर्ण केली आहेत, तीच आश्वासने ते त्यांच्या जाहीरनाम्यातून देत आहेत, असा दावा पंतप्रधानांनी केला.गोव्यातील जनतेने या पक्षांना त्यांची "हिंसा आणि दंगलीची संस्कृती" येथे आणू नका, असे मोदी पुढे म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार