सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डिचोलीत घरोघरी जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांनी प्रचार केला...

भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मये मतदारसंघात घरोघरी प्रचार केला व भाजपाचे मये मतदारसंघाचे उमेदवार प्रेमेंद्र शेठ यांना निवडून द्या .असे आवाहन मतदारांना केले .

Snehal Joshi
  • Feb 10 2022 1:09AM

डिचोली व साखळी येथे जाहीर सभा घेउन  भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मये मतदारसंघात घरोघरी प्रचार केला व भाजपाचे  मये मतदारसंघाचे उमेदवार  प्रेमेंद्र शेठ यांना निवडून द्या .असे आवाहन मतदारांना केले .यावेळी शहा याने नार्वे येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी   पुनरनिर्माण  केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले .

त्यानंतर अमित शहा यांनी डिचोली येथील आतील पेठ मध्ये जाऊन घरोघरी प्रचार करण्यापूर्वी श्री शांतादुर्गा देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर डिचोली येथे राजेश पाटणेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अमित शहा यानी मये आणि डिचोली येथे केलेल्या घरोघरी प्रचारच्यावेळी नागरिकांनी उदंड प्रतिसाद त्यांना दिला. प्रत्यक्ष देशाचे गृहमंत्री आपल्या  दारात मते मागण्यासाठी आलेत. हा आनंदच मतदारांच्या तोंडावर दिसून येत होता.

दोन्ही ठिकाणी सुहासिनीनी शहा यांना ओवाळले यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉक्टर  प्रमोद सावंत , भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व उमेदवार उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार