सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रातील सरकार गोव्या 2022 ते 2023 विकासासाठी 3152 कोटीचे अनुदान देणार.

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी हल्लीच सादर केलेला अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत करणारा असून सर्वसामान्य घटकासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक विविध क्षेत्रामध्ये करणारा आहे. गोव्यासाठी हा अर्थसंकल्प फारच लाभदायक...

Snehal Joshi .
  • Feb 5 2022 11:15PM

पणजी  :
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रामध्ये सत्तेवर असल्यामुळे गोव्यासाठी  २०२२ ते २०२३ या वर्षासाठी ३१५२ कोटीचे रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यापूर्वी  कॉंग्रेसच्या काळात २०१३- १४ साली  हे अनुदान फक्त  ४३२ कोटी होते. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात  भाजपचे डबल इंजिनचे सरकार सत्तेवर आल्यामुळे गोव्यासाठी केंद्राकडून भरीव  अनुदान मिळत आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रासाठी करोडो रुपयाची आर्थिक मदतही मिळत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन व बंदर  राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज केले .पणजी येथील भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी भाजपाचे गोवा प्रभारी सि टी रवी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीपाद नाईक यांनी सांगितले की केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी हल्लीच सादर केलेला अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत करणारा असून सर्वसामान्य घटकासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक विविध क्षेत्रामध्ये करणारा आहे. गोव्यासाठी हा अर्थसंकल्प फारच लाभदायक असून
२०१४ - २० या काळामध्ये चार हजार कोटीची आर्थिक मदत गोव्याला आतापर्यंत मिळालेली आहे. डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचे अनुदान सात पटीने वाढलेले आहे .तर गोव्याचे दरडोई उत्पन्नही भाजप सरकारच्या काळांमध्ये  २.५८ लाख वरून ५.२० लाख पर्यंत वाढल्याचे नाईक यांनी सांगितले.

गोव्याची प्रगती इतर राज्यांच्या तुलनेने भरीव झालेले असून
रेल्वेसाठी २० हजार कोटीची तरतूद
यापूर्वी करण्यात आली होती ती तरतूद आता  १.३७ लाख कोटी पर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगून पोलीस खात्याला सुसज्ज करण्यासाठी ७३८७ कोटी अनुदान देण्यात येत होते ते आता ८.१४ लाख कोटी पर्यंत मिळणार आहे. देशातील विविध राज्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एक लाख कोटीचे वाटप करण्यात येणार असून त्यात गोवा राज्यालाही बराच निधी मिळणार आहे .आणि त्याचा लाभ गोव्याच्या विकास प्रकल्पासाठी होणार असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. एकूणच  हा अर्थसंकल्प  गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी गोव्याला भरीव आर्थिक मदत देणारा आणि एकूणच  शेतकरी आणि इतर गरीबांना मदत करणारा असल्याचेही श्रीपाद नाईक यांनी सांगितले .

सर्वसामान्याला आर्थिक आधार देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगून गती शक्तीला जोर देऊन साधन सुविधा उभारून रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात देशात तयार होणार आहे. आरोग्य सुविधासाठी भरीव गुंतवणूक करण्यात आलेली असून शेतकऱ्यासाठी  आधारभूत किमत साठी २३७ लाख लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीला यंदाचा अर्थसंकल्प चालना   देणारा आहे. असे सांगून सहकार क्षेत्रात स्पर्धात्मक विकासाची संधी उपलब्ध करणारा  आहे. पंतप्रधान गृह योजनेअंतर्गत  ८० लाख घरे बांधण्यात येणार असून प्रत्येक घरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवण्यासाठीच्या योजनेसाठी वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे. लघुउद्योजकांना चालना देतानाच येत्या काळात भारत बलशाली व आर्थिक बाबी हाताळण्यात यशस्वी असा देश होणार असून डिजिटल विद्यापीठ ही संकल्पना वेगळी असल्याचे ही श्रीपाद नाईक म्हणाले . तीन वर्षात पीएम गती शक्ती योजनेच्या अंतर्गत अनेक केंद्रे देशभरात स्थापली जाणार असून गोव्यातही त्यातील काही केंद्र असतील ई  पासपोर्टच्या माध्यमातून विदेशात ये-जा करणाऱ्याना बराच लाभ होणार आहे. कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करण्यासाठी  आर्थिक तरतूद करण्यात आलेली असून शिक्षण  कृषी , युवक ,महिला, कष्टकरी या सर्वासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचे सांगून काँग्रेस सरकारच्या काळात गोव्याला अल्प निधी मिळत असे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर या निधीत भरीव  सात पटीने वाढ झाल्याचे  श्रीपाद नाईक यावेळी म्हणाले .केंद्र सरकार आणि गोवा सरकारने केलेल्या विकासाचा फायदा येत्या निवडणुकीत भाजपला निश्चित मिळणार असून गोव्यात भाजपचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार