सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधानांची रविवारी उत्तर गोव्यासाठी जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 6 रोजी दुपारी साडेचार वाजता उत्तर गोव्यातील 20 मतदारसंघातील मतदारांना थेट प्रक्षेपण पद्धतीने संबोधित करणार आहेत. यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान मोदी दक्षिण गोव्यातील वीस मतदारसंघात थेट प्रक्षेपण पद्धतीनेच मतदारांशी संवाद साधणार आहेत

Snehal Joshi .
  • Feb 5 2022 7:01AM

पणजी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 6 रोजी दुपारी साडेचार वाजता उत्तर गोव्यातील 20 मतदारसंघातील मतदारांना थेट प्रक्षेपण पद्धतीने संबोधित करणार आहेत. यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान मोदी दक्षिण गोव्यातील वीस मतदारसंघात थेट प्रक्षेपण पद्धतीनेच मतदारांशी संवाद साधणार आहेत.

उत्तर गोव्यातील संबोधनासाठी साखळी येथे खास व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सह प्रभारी दर्शना जरदोश, पक्षाचे राज्य प्रभारी सी. टी. रवी आदी उपस्थित राहतील. फडणवीस, मुख्यमंत्री आणि तानावडे यांच्या भाषणानंतर पंतप्रधान वीस मतदारसंघातील मतदारांना उद्देशून भाषण करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाविषयी राज्यभरात उत्सुकता आहे. गेले दशकभर भाजपची सत्ता राज्यावर आहे. राज्याला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांविषयी पंतप्रधान कोणते मार्गदर्शन करतील याकडे मतदारांचे डोळे लागून राहिलेले आहेत.

पंतप्रधानांचे भाषण ऐकता यावे आणि पाहता यावे यासाठी प्रत्येक मतदारसंघात एका ठिकाणी कोविड नियमावलीचे पालन करून प्रत्येक ठिकाणी पाचशे जणांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यासाठीही अशीच व्यवस्था असेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार