सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लोकांना आवडेल असा जाहीरनामा भाजप देणार... देवेंद्र फडणवीस

सगळ्याच राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा जनतेपुढे ठेवला आहे. मात्र अजूनही भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा गुलदस्त्यात असल्याने सगळ्यांची उत्कंठता वाढते आहे. लोकांना भावेल असा जाहीरनामा लवकरच देऊ, अशी माहिती फडणवीस यांनी एका मुलाखती तून दिली.

Snehal Joshi .
  • Feb 4 2022 12:26AM

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री  विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस गोव्यात मुक्कामाला आहे.  सगळ्याच राजकीय पक्षाने आपला  जाहीरनामा जनतेपुढे ठेवला आहे. मात्र अजूनही भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा गुलदस्त्यात असल्याने सगळ्यांची उत्कंठता वाढते आहे. लोकांना भावेल असा जाहीरनामा  लवकरच देऊ,  अशी माहिती फडणवीस यांनी एका मुलाखती तून  दिली.                 

  गोव्याच्या  राजकारणात भारतीय जनता पार्टीचे  शासन येण्याआधी  अस्थिरतेचे धुकं पसरलेलं असायचं. गोव्याच्या जनतेने दुर्दैवाने  5 वर्षात 7 मुख्यमंत्री बघितले आहे. भाजपने गेल्या 10 वर्षात गोव्याला  स्थिरता आणि विकास दिला आहे. सलग 10 वर्षाच्या स्थैर्या सोबत विकास, नाविन्यपूर्ण सुविधा,  भरगोस सुदृढ समाज जीवन भाजपच्या डबल इंजिन सरकारने गोवेकरांना दिला आहे.          

पहिल्याच आठवड्यात तारीख सुनिश्चित झाल्यानंतर भाजपचा जाहीरनामा जनतेपुढे येणार  असल्याचे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री म्हणाले.   रोजगाराभिमुख व्यवस्था, जनताभिमुख समाजकारण-राजकारण, राजकीय अर्थव्यवस्था लोकांना भावेल असा जाहीरनामा...  लोकांच्या मागण्या पूर्ण करणारा असेल. तो  लोकांना नक्कीच आवडेल असे ही ते  म्हणाले .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार